माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्
मणक्राव कोकेटे: 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्या प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना न्यायालयाने वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. तर शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थागितीवर सुनावणी लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माणिकराव कोकाटे यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा घेणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी विधान परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून प्रचंड गदारोळ सुरु झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले होते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल, असं वाटलं नव्हतं. विरोधी पक्ष नेत्यांना सांगू इच्छितो की, आपण मंत्रिमहोदयासंदर्भात जे मांडत आहात. त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले.
नार्वेकरांच्या दालनात बंद दाराआड चर्चा
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये विधीमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा करण्यात आली. 10 ते 15 मिनिटं चौघांमध्ये बंद दाराआड चर्चा करण्यात आली. या बैठकीतील चर्चा अद्याप समोर आलेली नाही. मात्र, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=jj1iehnzqzo
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.