मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, जालन्यातील मोर्चानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल

जालना : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, देशमुख यांच्या मारेकर्‍यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी, इत्यादि मागण्या जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. अशातच आज जालना येथे मोर्चा काढण्यात आला.   या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी मनोज जरांगे यांनी  व्यासपीठावर न जाता आंदोलकांमध्ये बसने पसंद केलं आहे.

दरम्यान, जालना येथील मोर्चात सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या डॉक्टर त्यांची तपासणी करत असून  त्यांना सलाईन लावण्यात आला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर

जालना (Jalna) येथे आज मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आणि सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बोलत असताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

वैभवी देशमुख म्हणाली की, आज आमचा आनंद आमच्यापासून फिरवून घेतला आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभे राहू शकलो, तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकलो. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा. वैभवी देशमुख पुढे म्हणाली की, आज आमचा आनंद आमच्यापासून फिरवून घेतला आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभे राहू शकलो, तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकलो. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा.

सुरेश धसांची पाठ, तर मनोज जरांगे  सर्वसामान्यांत

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चात कोणीही राजकीय भाषण करणार नाही.  तसेच कोण्या नेत्याला आणि समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नये, अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. कालपासून व्यासपीठावर फक्त देशमुख कुटुंबातील सदस्यच असतील अशा प्रकारची भूमिका या समन्वयकांनी घेतली होती आणि याच भूमिकेमुळे आमदार सुरेश धस जालन्यातील मोर्चात सहभागी झाली नसल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्ष व्यासपीठावरती आयोजकांनी फक्त देशमुख कुटुंबालाच वर येण्याच आवाहन केलं. मात्र यानंतर काही राजकीय कार्यकर्ते आणि प्रतिनिधी वर आल्यामुळे आयोजकांनी मनोज जरांगे यांना देखील व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं. मात्र मनोज जरांगे  व्यासपीठावर गेले नाहीत.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.