मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी महाराष्ट्र दौरा; 7 डिसेंबरपासून मराठा बांधवांच्या अडचणी घेणार जाणून

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या राज्यव्यापी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सव काळात जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं. मुंबईकडे कूच करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, सराकरने मध्यस्थी केली आणि आंदोलन स्थगित करण्यात आलं. सराकारला मागण्या मान्य करण्यासाठी अवधी दिला असला तरी, राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना अद्यापही कुणबी प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आपल्या दौऱ्याची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटील 7 डिसेंबरपासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करणार आहे. दौरा एकूण चार ते पाच टप्प्यांमध्ये पार पडणार असून दौऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस भेट दिली जाणार आहे. या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याला भेट देणार हे 1 डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, जरांगे पाटील आपल्या दौऱ्यामध्ये मराठा बांधावांना कुणबी नोंद आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे दिली जात आहेत की नाही, याचा सविस्तर आढावा घेणार आहेत. प्रमाणपत्र प्रक्रियेत येणाऱ्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी समजून घेण्यासाठी मराठा बांधवांनी दौऱ्यावेळी प्रत्यक्ष भेटून आपल्या तक्रारी व समस्या मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments are closed.