मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत


मनोज जरंगे पाटील काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणारे आंदोलन मनोज जरांगे (Manoj jarange )यांना मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) चौकशीसाठी समन्स बजावले आहे .येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात . मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबरला आजाद मैदानात आमरण उपोषण केलं होतं .परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी जरांगे पाटलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता .

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे.  धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच माझ्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं जरांगे पाटलांनी म्हटल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. दुसरीकडे, काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे सध्या जरांगे पाटील अडचणीत आले आहेत.

मनोज जरंगे : मनोज जरंगेंना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे .मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला आहे .येता 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . या प्रकरणात पांडुरंग तारक, गंगाधर कालकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत या चार जणांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते .या आंदोलनासाठी कोणतेही अधिकृत परवानगी न घेतल्याचा आरोप करत पोलिसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता .या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले असून या चौकशीला मनोज जरांगे पाटील उपस्थित राहतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत . सध्या मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत .

मनोज जरांगे यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत .धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम केलं .मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली .भाऊबीजेच्या दिवशी ही बैठक झाली होती असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं .यावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत माझी आणि जरांगे यांची ब्रेन टेस्ट करा .  या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी केली .

आणखी वाचा

Comments are closed.