मी देवेंद्र फडणवीसांच्या आईला कवा शिवी दिली, काही बोलून गेलो असेन तर शब्द मागे घेतो: मनोज जरांग
मनोज जरेंगे आणि देवेंद्र फड्नाविस: मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले.पण मग देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्यावे. देवेंद्र फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे, तू मुख्यमंत्री आहेस. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते, त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई-बहिणींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते सोमवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी 27 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करेल, असे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या रविवारच्या पत्रकार परिषदेनंतर चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली. तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
ती जी बाई बोलली, कोण वाघीण तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा दिसलं नाही का? तेव्हा तू कुठे मे%$, आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू झोपली होतीस का? तेव्हा तुला कोणी दिसलं नाही का, तेव्हा तू कुठे गेली होती? आता तुझी जात जागी झाली. कवर तू खेटरं चाटतेस, माझ्या नादी तू लागू नकोस. तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. यावर आता चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=Oz-8ai1mz64
आणखी वाचा
सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून व्याख्या सांगितली!
मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!
आणखी वाचा
Comments are closed.