अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला; एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात, फोनवरुन विचारपूस
कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा ताजी अपडेट: अमेरिका अन् इस्त्रायलकडून इराणच्या मुख्य भागांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हवाई हल्ल्यात इराणचं प्रचंड नुकसान झालं. इराणनंही प्रत्युत्तर दिलं. कुवेत, दुबई यांसह इतर देशांवर क्षेपणास्त्र डागली. मध्य पूर्वेतील तणाव दिवसागणिक वाढत चालला आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. तसेच नाहक त्रास इतर देशातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. दुबईत काही भारतीय नागरिकांसह कलाकारही अडकले आहेत. काही कलाकार सुरक्षित स्थळी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुवेतमध्येही काही भारतीय नागरिक अडकले आहेत. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनयही कुवेतमध्ये अडकला आहे. तिनं व्हिडिओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशाखाच्या मदतीला धावून गेले आहेत.
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा सध्या कुवेतमध्ये अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो लंडनच्या दिशेनं निघाला होता. मात्र, त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलं. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विशाखाच्या मुलाची कुवेतमध्ये अडचण होत आहे. विशाखानं रडत मुलाच्या मदतीची मागणी केली. दरम्यान, तिच्या मदतीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले आहेत. त्यांनी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं.
एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे विशाखाची संपर्क साधला, ‘लवकर तुमच्या मुलाला इकडे आणू आपण. त्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्याची व्यवस्था आम्ही इथून करतो. काळजी करु नका. काही अडचण असेल तर, कॉन्टेक्ट करा..’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
कुवेतमध्ये अडकलेल्या मुलासाठी मदतीची मागणी
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा सध्या अडचणीत सापडली आहे. तिनं नुकतंच एक रडत रडत व्हिडिओ शूट केला आहे. तसेच सोशल मीडियात शेअर केला आहे. तिनं व्हिडिओतून कुवेतमध्ये अडकलेल्या मुलासाठी मदतीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. युद्धजन्य स्थितीमुळे विशाखा सुभेदार आपल्या मुलाच्या काळजीपोटी घाबरली आहे. तिनं व्हिडिओ शेअर करत कॅप्शनद्वारे सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. ‘कृपया मला मदत करावी, माझा मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमध्ये अडकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांनी कृपया मदत करावी..’, असं कॅप्शन लिहिलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.