अरेरे! नोवाक जोकोविचला यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का, 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले असे

यूएस ओपन 2026 च्या पहिल्याच फेरीत अनुभवी टेनिसपटू नोवाक जोकोविच याला धक्का बसला आहे. सर्बियन स्टारला अर्जेंटिनाच्या मारियानो नाव्होने याने 7(7) – 6(5), 5-7, 4-6, 6-2, 6-1 असे पराभूत केले. सोमवारी (31 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या धक्कादायक निकालानंतर जोकोविच स्पर्धेबाहेर झाला आहे.

नाव्होने या स्पर्धेत बिगर मानांकित खेळाडू म्हणून सहभागी झाला आहे. या सामन्याआधी 24 ग्रॅंड स्लॅम विजेतेपद जिंकलेल्या जोकोविचविरुद्ध त्याच्या विजयाची शक्यता कमी मानली जात होती. मात्र सामन्यामध्ये नाव्होने जे केले त्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत.

2 दशकाची विजयी मालिका संपुष्टात…
आपल्या दीर्घ काळाच्या कारकिर्दीत जोकोविच गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला आहे. त्याने 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमधून ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पदार्पण केले होते. 2006 च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेतील हा त्याचा पहिल्या फेरीतील पहिलाच पराभव होता. त्यामुळे त्याची दोन दशकाची विजयी मालिका संपुष्टात आली.

जोकोविचविरुद्धच्या पाच सेटच्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर नाव्होनेने आनंद व्यक्त केला. हा विजय त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय असून त्याचे स्वप्न साकार झाले असल्याचे अर्जेंटिनाच्या टेनिसपटूने म्हटले आहे.

जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानावर असलेल्या नाव्होनेने 4 तास 36 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात चार वेळेचा यूएस ओपन विजेता जोकोविचला चांगलीच झुंज देत पराभूत केले.

सामना जरी गमावला असला, तरी जोकोविचने अनेक विक्रम केले. हा त्याच्या यूएस ओपनमधील 20 वा सामना होता. या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये हा टप्पा गाठणारा तो केवळ चौथाच खेळाडू ठरला आहे. यामध्ये जिमी कॉनर्स, आंद्रे आगासी आणि फेलिसियानो लोपेझ यांचा समावेश असून आता त्यांच्या पंक्तीत जोकोविच सामील झाला आहे. (Mariano Navone defeats 24-time Grand Slam Champion Novak Djokovic in five sets in US Open 2026 First Round)

Comments are closed.