परभणीत विवाहितेचा मृत्यू, सासरच्या मंडळींनी छळ करुन खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप

परभानी: परभणीच्या (Parbhani) जिंतूर तालुक्यातील वर्णा गावात एका 32 वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ करुन रक्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वंदना विष्णु अंबुरे असं मृत विवाहितेचं नाव आहे.  याप्रकरणी सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.  ज्यावरुन बोरी पोलीस आणि विवाहितेच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली आहे. तसेच सदर विवाहितेचा मृतदेहही ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. आज दुपारपासून नातेवाईक आणि त्यांचा मृतदेह हा बोरी येथील रुग्णालयात आहे.

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील वंदना यांचा विवाह वर्णा येथील विष्णु अंबुरे यांच्याशी झाला होतं. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचा मानसिक छळ शारीरिक छळ केला त्यातच आज दुपारी दीड वाजता वंदना यांच्या घरच्यांना कळवण्यात आली की त्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी तात्काळ वंदना यांच्या माहेरची मंडळीही त्यांच्या गावी वर्णा येथे पोहोचली.  त्यांनी त्यांचा मृतदेह बघितला त्यावेळी वंदना यांच्या गळ्यावर व्रण दिसून आले. त्यांचा मृतदेह हा शव विच्छेदनासाठी बोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी वंदना यांचा मृत्यू झाला नसून त्यांचा सासरच्या मंडळींनी केल्याचा खून आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नवऱ्यासह सासऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही

जोपर्यंत त्यांच्या नवऱ्यावर आणि सासऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वंदना यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतला आहे. त्यामुळं दुपारपासून वंदना यांचा मृतदेह बोरी येथील रुग्णालयातच आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यावरुन पोलीस आणि वंदना यांच्या माहेरच्या मंडळींच्या नातेवाईकांमध्ये जोरदार बाजाबाची झाली आहे. यामुळं बोरी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या

उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिर परिसरात किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. साजिद शेख असं हत्या केलेल् युवकाचं नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. या प्रकरणी पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या:

अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत

आणखी वाचा

Comments are closed.