मार्श मॅकलेननला विजेतेपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मार्श मॅकलेनन संघाने अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाचा 110 धावांनी दणदणीत पराभव करत सुवर्ण महोत्सवी ठाणे वैभव आंतर कार्यालयीन टी -20 क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटाचे विजेतेपद संपादन केले. विजयासाठी 199 धावांचा पाठलाग करणाऱ्या अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाला 89 धावांवर गुंडाळत मार्श मॅकलेनन संघाने विजय निश्चित केला.

प्रदीप शर्मा, चिन्मय कदम आणि हर्ष मिश्राने बऱ्यापैकी फलंदाजी करत संघाला दीड शतकी धावसंख्या उभारून दिली. प्रदीपने 38, चिन्मयने नाबाद 37 आणि हर्षने 22 धावा केल्या. या डावात पराभूत संघाच्या अजिंक्य पवारने तीन विकेट मिळवले. तर सोनू जैसवार, प्रतीक भोसले, देवकिरण चेट्टी, ओमकार सावंत आणि वैभव मुजगेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल मार्श मॅकलेनन संघाच्या नियंत्रित गोलंदाजीसमोर अप्लाइड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यांच्या हृतिक परबने 19 आणि वैभव मुजगेने 15 धावा केल्या. संघाला विजयाची दिशा देताना शिवप्रकाश जैसवालने तीन, आशुतोष घागरेने दोन आणि केतन खरात, चिन्मय कदम, श्रेयस केळकरने प्रत्येकी एक विकेट मिळवला.

Comments are closed.