माझगाव डॉकमधील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही! भारतीय कामगार सेनेचे आश्वासन
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये ‘फिक्स्ड टर्म’ (मुदतबद्ध तत्त्वावर) काम करणाऱया कामगारांवर होणारा अन्याय त्वरित दूर करून त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पॅप्टन जगमोहन यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सविस्तर पत्र दिले.
खासदार सावंत यांनी पंपनीच्या सध्याच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 5 ते 14 वर्षे मुदतबाहय़ तत्त्वावर प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही पंपनी कामगारांना सेवेत कायम करत नाही, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंत्राट संपल्यावर या अनुभवी कामगारांना जुन्या वेतनावर पुन्हा त्याच पदासाठी नव्याने परीक्षा देण्यास भाग पाडले जाते. पाच वर्षांच्या सेवेनंतर या कामगारांचे मूळ वेतन 19,150 रुपये होते ते पाच वर्षांनंतर पुन्हा 17,000 रुपयांवरून सुरुवात करावी लागते तेही परीक्षा पास झाली तर. कामगारांचा हा मोठा अपमान असून, जागतिक दर्जाच्या युद्धनौका व पाणबुडय़ा बनवणाऱया पंपनीला हे अजिबात शोभणारे नाही, असे सावंत यांनी निदर्शनास आणून दिले.
ज्येष्ठतेनुसार कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या!
या सर्व ‘फिक्स्ड टर्म’ कामगारांना कोणतीही नवीन परीक्षा न घेता त्यांच्या ‘ज्येष्ठता आणि शारीरिक योग्यतेनुसार’ कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी सावंत यांनी केली आहे. ऑक्टोबर 2026 पासून या अनुभवी कामगारांचे पंत्राट संपत असल्याने त्यांना नोकरीची सुरक्षितता मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पंपनीत सध्या 2500 कामगारांची गरज असताना केवळ 1500 कामगार उपलब्ध आहेत आणि उर्वरित काम खासगी पंत्राटदारांना दिले जात आहे. हे पंत्राटदार अकुशल कामगार आणत असल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पंपनीने हा धोकादायक प्रकार त्वरित थांबवावा, असेही त्यांनी नमूद केले.
…तर कामगारांच्या हक्कांसाठी आंदोलन
कामगारांसोबत संवाद साधताना खासदार सावंत म्हणाले, व्यवस्थापनासोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, येत्या काळात हा प्रश्न सुटला नाही, तर कामगारांच्या हक्कांसाठी आंदोलन पुकारले जाईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेना कर्मचाऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून ‘माझ्या कामगारांच्या घरातील चूल मी कोणत्याही परिस्थितीत विझू देणार नाही,’ असा शब्द खासदार सावंत यांनी दिला.
Comments are closed.