MCA निवडणुकीच्या पात्र उमेदवारांचा आज न्यायालयात फैसला; शरद पवारांकडून सदस्यांची तातडीची बैठक


एमसीए निवडणूक: एमसीए निवडणुकीतील कोर्टात प्रलंबित अंतिम उमेदवारांच्या यादीवरील आक्षेप प्रकरणासंदर्भात आज (७ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकीचा (Mumbai Cricket Association MCA) वाद आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला असून तूर्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अंतरिम मनाई करण्यात आली होती. त्यांनतर यावर आज सुनावणी पार पडणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी सदस्यांच्या अंतिम यादी बाबत सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे एमसीए निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा देखील आजचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) सकाळी साडे नऊ वाजता आपल्या गटाच्या सदस्यांची तातडीची बैठक बोलावली आहेसिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी हि बैठक बोलावली असल्याची माहिती आहे.

MCA Election : राजकीय नेत्यांच्या सहभाग, बहुरंगी निवडणूक

मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी सदस्यांच्या अंतिम यादी बाबत सुनावणी तर दुसरीकडे एमसीए निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सध्या अध्यक्ष पदासाठी अजिंक्य नाईक, विहंग सरनाईक, प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, डायना एडलजी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.  येत्या 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी (Diana Edulji) या सुद्धा शर्यतीत आहेत. एडलजी या एकमेव प्रमुख क्रिकेटपटू उमेदवार आहेत. याशिवाय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांनीही अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बहुरंगी झाली आहे.

एमसीए निवडणूक: काय आहे प्रकरण?

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी 24 ऑक्टोबरला निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर एमसीएचे जुने सदस्य श्रीपाद हळबे व अन्य काही जणांनी आक्षेप घेत आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारणं न देता त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या. तसंच 24 ऑक्टोबरला थेट अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्याचा आरोप करत श्रीपाद हळबे व इतरांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय.

Mumbai Cricket Association : काय आहे याचिका?

निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर आपल्या हरकती फेटाळल्या, त्याची कारणं निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीत. ती कारण सविस्तरपणे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. त्यानुसार याचिकाकर्त्यांना सविस्तर आदेशाची प्रत नुकतीच देण्यात आलीय. या याचिकेवर न्यायमूर्ती रियाज छागला व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयानं एमसीए कार्यकारणी निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत कोणतीही घाई न करता तूर्तास परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश कायम ठेवत 7 नोव्हेंबरला एमसीएच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत विचार केला जाईल, असं स्पष्ट केलंय.

हे देखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.