बांगलादेशात गोवरचा उद्रेक, हिंदुस्थानसह दक्षिण आशियाई देशांसाठी इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांगलादेशात गोवरचा उद्रेक झाला आहे. लसीकरणातील त्रुटी आणि कोविड-19 नंतर विस्कळीत झालेल्या आरोग्य सेवांमुळे गोवरचा प्रादुर्भाव अधिक गंभीर बनला आहे. हिंदुस्थानासह दक्षिण आशियाई देशांसाठी हा इशारा मानला जात आहे.

कोविडनंतर नियमित लसीकरण मोहिमा विस्कळीत झाल्याने ‘इम्युनिटी गॅप’ निर्माण झाली. परिणामी गोवरसारख्या आजारांना पुन्हा फैलावाची संधी मिळाली आहे. काही ठिकाणी लसपुरवठा कमी पडणे तर काही ठिकाणी आरोग्य यंत्रणेतील अडचणी, यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2026 च्या सुरुवातीपासून बांगलादेशात हजारो संशयित गोवर रुग्ण आढळले आहेत. उद्रेकाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असून मृत्यूंची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत आहे. तज्ञांच्या मते, गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किमान 95 टक्के लोकसंख्येला लसीचे दोन डोस देणे आवश्यक असते. मात्र बांगलादेशात लसीकरणाचे प्रमाण काही भागांत अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्लक्षित भागांमध्ये अनेक मुले लसीपासून वंचित राहिली आहेत.

लसीकरण वाढवण्याची गरज

गोवरचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरतो. त्यावर प्रभावी लसीकरणाची गरज आहे. हिंदुस्थानने गेल्या काही वर्षांत लसीकरण मोहिमांमध्ये प्रगती केली असली तरी काही भागांमध्ये अजूनही लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. शहरी झोपडपट्ट्या, दुर्गम ग्रामीण भाग आणि स्थलांतरित लोकसंख्या यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यात अजूनही अडथळे आहेत.

Comments are closed.