Mega Block – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, हार्बर मार्गावर ब्लॉक नाही

ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या उपनगरीय मार्गावरील पाचव्या व सहाव्या मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात येतील तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत खालील डाऊन दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर गोदान एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस, मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस, काकीनाडा पोर्ट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस, हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल, हतिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस आणि चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

वसई रोड स्थानकावरून सकाळी 9.50 वाजता सुटणारी वसई रोड – दिवा मेमू कोपर स्थानक येथेच शॉर्ट टर्मिनेट होईल. दिवा स्थानकावरून सकाळी 11.30 वाजता सुटणारी दिवा – वसई रोड मेमू कोपर स्थानकात सकाळी 11.45 वाजता शॉर्ट ओरिजिनेट होईल. दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान मेमू सेवा रद्द राहील.

मेन, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट लाईन्सवर मेगा ब्लॉक नाही

मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विभाग आणि हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विभाग येथे कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही.

Comments are closed.