Ratnagiri News – कुठे आहे सरकार? कळझोंडीच्या गावकऱ्यांनी पै पै गोळा करून लोकसहभागातून बांधला साकव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी नदीवरील साकव अनेक वर्षे नादुरुस्त होता. नवीन साकव बांधून द्यावा यासाठी ग्रामस्थ सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होते. ग्रामस्थांच्या मागणीला सरकारने कायम केराची टोपली दाखवली. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी पै पै गोळा करून लोकसहभागातून कळझोंडी नदीवर साकव बांधला.

नवीन साकवाची मागणी करूनही शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्याचे लक्षात येताच कळझोंडी गावचे ग्रामस्थ एकत्र आले.ग्रामस्थांनी स्वतः आर्थिक नियोजन करून कळझोंडी कुंभवणे वाडी या ठिकाणी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या नदीवरील साकवाचे काम लोकसहभागातून पूर्ण केले. तालुक्यातील सर्वच ग्रामस्थांसाठी ही अतिशय प्रेरणादायी बाब आहे गाव जर एकजुटीने एकत्रित आला तर काय होऊ शकतं याचे हे एक जीवंत उदाहरण पहायला मिळाले.

कळझोंडी नदीवर लोकसहभागातून बांधलेल्या सावंतांचे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावकऱ्यांच्या एकजूटीमुळे आपण हे काम करू शकलो गावची एकजूट कायम ठेवा असे आवाहन प्रथमेश गावणकर यांनी यावेळी केले.

Comments are closed.