इटलीमध्ये पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम मेलोनी यांच्या नावावर आहे.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन : राजकीय अस्थिरतेवर मात
वृत्तसंस्था, रोम
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी युद्धोत्तर इतिहासात एक मोठा देशांतर्गत विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. 4 सप्टेंबर रोजी त्यांच्या सरकारने सलग 1413 दिवस पूर्ण पेले आहेत. याचबरोबर मेलोनी या इटलीच्या युद्धोत्तर इतिहासात सर्वाधिक काळ सातत्याने पदावर राहणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन पेले आहे.
मेलोनी यांनी माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचा विक्रम मागे टाकला आहे. बर्लुस्कोनी यांचे सरकार 2001-05 पर्यत सलग 1412 दिवसांपर्यंत सत्तेवर राहिले होते. मेलोनी यांच्या सरकारने हा विक्रम मोडला आहे.
80 वर्षांमध्ये इटलीत 68 सरकारं
इटलीत दुसऱ्या महायुद्धानंतर राजकीय अस्थिरतेचा मोठा इतिहास राहिला आहे. सुमारे 80 वर्षांमध्ये देशात 68 सरकारं स्थापन झाली आहेत आणि एका मंत्रिमंडळाचा सरासरी कार्यकाळ सुमारे 14 महिने राहिला आहे. अशास्थितीत मेलोनी यांचे दीर्घकाळ सत्तेवर राहणे राजकीय स्थिरतेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
मोदी अन् मेलोनी यांच्यात दृढ संबंध
पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यादरम्यान मागील काही वर्षांमध्ये दृढ राजनयिक संबंध दिसून आले आहेत. दोन्ही देशांनी स्वत:च्या संबंधांना विशेष व्यूहात्मक भागीदारीपर्यंत पोहोचविले आहे. भारत आणि इटलीदरम्यान व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा समवेत अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर जोर देण्यात येत आहे. यापूर्वी जून महिन्यात मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन पेले होते. तेव्हा मोदींनी भारतात सर्वाधिक काळापर्यंत सातत्याने पदावर राहणारा निर्वाचित पंतप्रधान होण्याचा विक्रम केला होता.
युरोपमधील सर्वात प्रभावी नेत्या
जॉर्जिया मेलोनी या युरोपीय महासंघातील सर्वात प्रभावी नेत्या ठरल्या आहेत. त्यांनी युक्रेनचे समर्थन करणे जारी ठेवले आहे तसेच स्थलांतर आणि व्यापारावर होणाऱ्या चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मेलोनी यांच्या सरकारच्या काळात इटलीतील बेरोजगारी दर कमी होत 5 टक्क्यांवर आला आहे. त्यांच्या सरकारने इटलीच्या अर्थसंकल्पालाही युरोपीय महासंघाच्या मर्यादांच्या आत ठेवले आहे. तर 2023 नंतर उत्तर आफ्रिकेतून नौकांद्वारे येणाऱ्या शरणार्थींच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
Comments are closed.