FIFA World Cup 2026 दक्षिण कोरियावर 1-0 ने मात करत मेक्सिकोचा बाद फेरीत प्रवेश
FIFA World Cup 2026 मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण कोरियावर १-० असा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. या विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारणारा पहिला संघ बनण्याचा बहुमान मेक्सिकोने मिळवला आहे.
2022 च्या विश्वचषकात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या मेक्सिकोसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या घरच्या मैदानावर, स्थानिक चाहत्यांच्या प्रचंड उत्साहात मेक्सिकोने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सामना संपल्यानंतर मेक्सिकोच्या खेळाडूंनी मैदानाच्या मध्यभागी येऊन आनंद साजरा केला आणि ‘इस्टाडिओ अक्रॉन’ स्टेडियमवर उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांना अभिवादन केले.
सामन्याच्या 50 व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ अगदी ताकदीने खेळत होते. दक्षिण कोरियाच्या खेळाडूकडून झालेल्या चुकीचा फायदा घेत मेक्सिकोने गोल केला व विजयावर आपले नाव नोंदव ले. 50 व्या मिनिटाला दक्षिण कोरियाचा गोलरक्षक किम सुंग-ग्यु आणि बचावपटू ली गी-ह्युक यांच्यात टक्कर झाली, ज्यामुळे त्यांच्याकडून चेंडू सुटला. तिथेच दबा धरून बसलेल्या मेक्सिकोच्या लुईस रोमोने या चुकीचा अचूक फायदा गोल केला आणि मेक्सिकोला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
८७ व्या मिनिटाला दक्षिण कोरियाला बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी होती. चो ग्यु-संगने मारलेला सुरेख हेडर मेक्सिकोचा गोलरक्षक राऊल रांहेलने उत्कृष्टरित्या अडवला. त्यानंतर रिबाऊंडवर यांग ह्यून-जूनने केलेल्या गोलच्या प्रयत्नालाही रांहेलने उजवा हात पुढे करत चेंडू गोललाईन पार करण्यापासून रोखले.
Comments are closed.