कोचपदावरून गंभीरला आधी हकला…; भर लाईव्ह कॅमेऱ्यासमोर टीम इंडियाचा वर्ल्डकप विजेता खेळाडू संता

एस श्रीशांतने गौतम गंभीरवर टीका केली आहे : एस श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद क्रिकेट जगताला नवा नाही, मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत श्रीसंतने थेट गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी केल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. श्रीसंतने ऑन-कॅमेरा संताप व्यक्त करत भारतीय संघाला गंभीरची नव्हे, तर महेंद्रसिंग धोनीसारख्या मार्गदर्शकाची गरज असल्याचे म्हटले आहे.

गौतम गंभीरला हटवा; श्रीसंतची थेट मागणी (S Sreesanth on Gautam Gambhir)

श्रीसंतच्या मते, सध्याच्या भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाला तांत्रिक कोचिंगपेक्षा एका चांगल्या मेंटॉरची जास्त गरज आहे. गंभीर खेळाडूंवर विनाकारण दबाव निर्माण करतो, असा आरोप त्याने केला. मुलाखतीत बोलताना श्रीसंत म्हणाला की, “सध्याच्या टीम इंडियामध्ये गंभीरचे काय काम आहे? संघाला प्रशिक्षकाची नाही तर एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे. गंभीरच्या जागी महेंद्रसिंग धोनीला मेंटॉर म्हणून आणले पाहिजे. गंभीरला तातडीने पदावरून हटवून धोनीकडे ही जबाबदारी सोपवावी.”

टी-20 विश्वचषक विजेतेपदाचे श्रेय गंभीरला नाही! (S Sreesanth on Gautam Gambhir)

राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्याच्या कार्यकाळात भारताने टी-20 विश्वचषक जिंकला. मात्र, श्रीसंतने या यशाचे श्रेय गंभीरला देण्यास पूर्णपणे नकार दिला. तो म्हणाला की, “लोक म्हणतात गंभीरने भारताला चॅम्पियन बनवले, पण त्याने नक्की काय केले? जर संघात संजू सॅमसन नसता, सूर्यकुमार यादवचे नेतृत्व नसते आणि तिलक वर्माने महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या नसत्या, तर भारत जिंकला असता का? त्यामुळे या विजेतेपदाचे श्रेय गंभीरला जाता कामा नये.”

भूतकाळातील वाद आणि कारकीर्द

गंभीर आणि श्रीसंत हे एकेकाळी एकत्र खेळले आहेत, पण 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर त्यांच्यात दरी निर्माण झाली. गंभीरने अनेकदा जाहीरपणे श्रीसंतवर टीका केली होती. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर श्रीसंतवरील सर्व आरोप हटले असले, तरी त्याचे आंतरराष्ट्रीय करिअर संपले होते.

श्रीसंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2005 ते 2011 या काळात बहरली. तो त्याच्या आक्रमक गोलंदाजी आणि स्विंगसाठी ओळखला जात असे. तो 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. कसोटी क्रिकेटमध्ये 27 सामने खेळून 78 विकेट्स घेतले. तर 53 सामने एकदिवसीय खेळून 75 बळी घेतले. तसेच त्याने 10 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात 7 बळी घेतले.

हे ही वाचा –

Lionel Messi Father Health : फिफा वर्ल्ड कपदरम्यान लियोनेल मेस्सीवर दुःखाचा डोंगर; वडिलांची मृत्यूशी झुंजतोय, आता थेट हॉस्पिटलमधून मोठी बातमी

Comments are closed.