उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकरांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत, धाराशिवमधील बड्या नेत्यांना
धाराशिवचे आमदार उद्धव ठाकरे यांची भेट: शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला असून पक्षातील तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार आहेत. या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात असतानाच, यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे.
काल शिवसेना ठाकरे गटाने सर्व खासदारांना बैठकीसाठी ‘व्हिप’ जारी केला होता, मात्र ओमराजे या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट मानले जात आहे. तसेच, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असून शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मातोश्रीवरून धाराशिवच्या नेत्यांना बोलावणे
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाच्या पवित्र्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धाराशिवमधील पक्षाची पडझड रोखण्यासाठी आणि संघटना मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी धाराशिवच्या आमदार आणि जिल्हाप्रमुखांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावले आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र तथा जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतील. या बैठकीत स्थानिक पातळीवर वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
ठाकरे-शिंदेंच्या मेळाव्यांकडे नजरा
दरम्यान, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यंत भव्य स्वरूपाची तयारी देखील करण्यात आली असून मुंबई, ठाणेसह इतर शहरांमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठीही पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?
1. संजय जाधव (परभणी)
2. संजय देशमुख (यवतमाळ– वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची यादी : उद्धव ठाकरे कोणते खासदार?
1. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
2. अनिल देसाई (दक्षिण मध्य)
3. राजाभाऊ वाजे (नाशिक)
हे ही वाचा –
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Comments are closed.