अर्जदारांची प्रतीक्षा संपणार, म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत पुढच्या आठवड्यात
म्हाडाच्या मुंबईतील 2,640 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला असून अर्जदारांची तीन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपणार आहे. या आठवडय़ाचा शेवटी किंवा पुढच्या आठवडय़ाच्या सुरुवातीला संगणकीय सोडत काढण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
म्हाडाने 30 मार्च रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा येथील 2,640 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या घरांसाठी तब्बल 75,366 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज नोंदणीला सुरुवात होऊन तीन महिने झाले तरी संगणकीय सोडतीची तारीख ठरत नसल्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. अखेर आता अर्जदारांची प्रतीक्षा संपणार आहे.
Comments are closed.