Ratnagiri News – साखरपा गुरववाडीत गव्यांचा कळप; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साखरपा येथील गुरववाडी परिसरात गव्यांच्या मोठ्या कळपाचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगत असलेल्या वाड्यांमध्ये गवे वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरववाडी परिसरात अनेक गवे एकत्र फिरताना दिसून आले. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. या गव्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. गुरववाडीचे माजी सरपंच शशांक लिंगायत यांनी या घटनेची माहिती देत सांगितले की, गव्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments are closed.