Ratnagiri News – महामार्गावरील मोकाट गुरांच्या प्रश्न गंभीर; प्रशासनाने लक्ष द्यावे, युवासेनेची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रात्री अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी युवासेना रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

युवासेनेने निवेदनात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना देण्यात यावी की नागरिकांनी गुरे महामार्गावर मोकाट सोडू नयेत याबाबत जनजागृती करावी. गुरांसाठी सुरक्षित गोठा उपलब्ध करून द्यावा, मोकाट गुरे आढळल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.यावेळी तालुकाप्रमुख मयूरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, संदेश नारगुडे, किरण तोडणकर, सचिन सावंतदेसाई, प्रशांत रायंगणकर, सुफियान जयगडकर, नंदकुमार कदम, सायली पवार, मिताली पवार, गंधाली मयेकर, सेजल बोराटे उपस्थित होते.

Comments are closed.