Ratnagiri News – 11 म्युल खातेधारकांविरोधात गुन्हे दाखल; रत्नागिरी सायबर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सायबर गुन्ह्यांत फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ११ म्युल बॅंक खातेधारकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत २ कोटी ४२ लाख ५९७ रुपयांची रक्कम पीडितांना परत मिळवून देण्यात आली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. म्युल खातेधारक, सीमकार्ड वापरकर्ते, मध्यस्थांचा शोध घेण्यात आला. ५ लाखांपेक्षा जास्त रकमेच्या २१ तक्रारीपैकी १४ तक्रारीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणुकीच्या १०३ व्यवहारांपैकी ६८ व्यवहारात हस्तक्षेप करत ३ कोटी ६० लाख ७८४ रूपयांपैकी २ कोटी ४२ लाख ५९७ रूपये पीडिताना परत मिळवून देण्यात आले आहेत.
Comments are closed.