सूरसम्राज्ञी आशा ताईंना वानखेडेवर श्रद्धांजली; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे डोळे पाणावले; रोहित

MI vs RCB IPL 2026 Asha Bhosle Tribute : आयपीएल 2026 मधील 20 व्या साखळी सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) हे दोन दिग्गज संघ आमने-सामने आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून, सामन्याच्या सुरुवातीला एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला.

भारतरत्न आशा भोसले यांचे निधन

भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान पर्व आज संपले आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले असून. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून, क्रीडा विश्वानेही त्यांना मानवंदना दिली आहे.

मैदानात वाहिली श्रद्धांजली

आशा ताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आजच्या सामन्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू आशा भोसले यांना श्रद्धांजली म्हणून हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. तर सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू, पंच आणि उपस्थित प्रेक्षकांनी एक मिनिटाचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. मौन पाळल्यानंतर संपूर्ण स्टेडियममधील चाहत्यांनी टाळ्या वाजवून या महान गायिकेच्या योगदानाचे स्मरण केले.

नाणेफेकीचा कौल

या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  कर्णधार हार्दिक पांड्याने जाहीर केले की, मिचेल सँटनर आणि मयंक मार्कंडे संघात परतले असून, अल्लाह गझनफर आणि दीपक चहर यांना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने जाहीर केले की, जोश हेझलवूडच्या जागी जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची प्लेइंग-11

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड,  जितेश शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा.

मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग-11

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा –

LSG vs GT IPL 2026 : पंत नावाचा नुसताच गाजावाजा, घरात घुसून गुजरातने नवाबांचा वाजवला बँड-बाजा! लखनऊच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये गणितच बदललं

आणखी वाचा

Comments are closed.