प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज करायला गेला अन् पोपट झाला, MI vs KKR सामन्यांत वानखेडे स्टेडियम

एमआय समर्थकाने केकेआर फॅनला प्रस्ताव दिला आयपीएल 2026 एमआय वि केकेआर : आयपीएल 2026 मधील दुसरा सामना रविवारी (29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR IPL 2026) यांच्यात रंगला. या हायस्कोरिंग सामन्यात मुंबईने 220 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करत शानदार विजय मिळवला. मात्र, सामन्यानंतर मैदानावरील नाही, तर स्टँडमधील एका रोमँटिक क्षणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

प्रपोजलचा फिल्मी प्लॅन झाला फेल…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक फॅन आपल्या गर्लफ्रेंडला अगदी फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसतो. मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेला हा तरुण, कोलकाता नाइट रायडर्सची जर्सी परिधान केलेल्या मुलीसमोर गुडघ्यावर बसतो… पण अचानक त्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो.

इतकंच नाही, तर त्याच्या हातातील अंगठीही खाली पडते. काही क्षणांसाठी सगळंच बिघडल्यासारखं वाटतं. मात्र, स्टँडमधील लोक मदतीला धावून येतात आणि अंगठी शोधून काढतात. शेवटी त्या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला अंगठी घालून प्रपोजल पूर्ण केलं, म्हणजेच पोपट होऊनही स्टोरीचा शेवट गोड झाला.

14 वर्षांनी मुंबईनं पहिल्यांदाच जिंकला आयपीएलचा सलामीचा सामना

रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या दमदार भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात कोलकात्यानं मुंबईसमोर विजयासाठी 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र रिकल्टन आणि रोहित शर्मा या जोडीनं पहिल्या षटकापासूनच कोलकात्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी साकारत मुंबईच्या विजयाचा पाया रचला.

रोहितनं अवघ्या 38 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 78 धावा फटकावल्या. तर रिकल्टननं 43 चेंडूत 41 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि तब्बल 8 षटकारांचा समावेश होता. मुंबईनं हा सामना 6 विकेट्स आणि 5 चेंडू राखून जिंकला. महत्त्वाचं म्हणजे 14 वर्षांनी मुंबईनं पहिल्यांदाच आयपीएलच्या मोसमाची विजयानं सुरूवात केली. 2012 च्या आयपीएलनंतर मुंबईला गेल्या 13 मोसमात एकदाही पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. मात्र यंदा मुंबईनं ती परंपरा मोडीत काढली.

हे ही वाचा –

PSL 2026 Controversy : 4 दिवसांत 4 कांड… PSL मध्ये बॉल टॅम्परिंगनंतर नवा वाद पेटला; हॉटेलमध्ये रात्री 11 वाजता नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.