मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; वांद्रे कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार

धनंजय मुंडे: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज दोन महिन्यांहून अधिकचा काळ उलटून गेले आहे. अशातच या प्रकरणामुळे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला आहे. अशातच मंत्री धनंजय मुंडेंच्या बाबातीत एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. करूणा मुंडे (Karuna Munde) प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून आव्हान देण्यात येणार असल्याचे सांगितलं जातंय.

दरम्यान, दंडाधिकारी कोर्टानं करूणा मुंडे यांचे धनंजय मुंडेंविरोधातील आरोप अंशत: मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं. यात करूणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रूपये भत्ता देण्याचे आदेश ही कोर्टाने दिले होते. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांचा आरोप अशा विविध आरोपांमुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. परिणामी सर्वस्थरातून आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. अशातच धनंजय मुंडे आज राजीनामा देतील, दोन दिवसांआधी धनजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे, असा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी काल शेअर केली होती. अशातच आज(3 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधानपरिषदेचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, फडणवीसांची भेट घेतल्यामुळे धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असावा का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. अशातच आता  मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?

धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे प्राधान्य आहे. त्यांचा राजीनाम लिहून घेतला आहे. मात्र आता तो दोन दिवस पुढे ढकलला आहे. दोन दिवसात आम्ही जाहीर करू अशी माहिती आहे. मला हे आचार्य वाटतंय की राजीनामा लिहून घेतला आहे. अजित पवार यांच्या पक्षात धनजय मुंडे यांचे मोठे पद आणि कर्तव्य आहे. म्हणून ते प्रेशर करत असेल की राजीनामा घेतला तर मी पार्टी सोडेल. 100 % मला विश्वास आहे आज संपूर्ण महाराष्ट्र एकाच मागणी करत आहे की, धनजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा. मी मंत्र्यांची बायको आहे, पण मी राजीनामा मागत आहे. याचे कारण आहे की आज जर राजीनामा नाही घेतला तर अजून पुढे असे लोक तयार होणार आणि वाल्मिक सारखे लोक तयार होणार. माझे पती भाजपसोबत होते तेव्हा चांगले होते. मात्र अजित पवार राष्ट्रवादीत गेले आणि वाटोळ झाले. धनजय मुंडे राष्ट्रवाडीत गेले आणि वाटोळ झाले. त्या पक्षात नवाब मलिक, हसन मुश्रीफ असे सगळे करप्ट लोक आहेत.अशी घणाघाती टीका  करुणा शर्मा मुंडे यांनी केली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.