संजय राऊत हेच सर्वात मोठे गद्दार, उद्धव ठाकरेंना मविआसोबत जाण्यास राऊतांनीचं प्रवृत्त केलं

संजय राऊतवरील शंभुराज देसाई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी ठेवण्या विषयी घेतलेल्या आक्षेपावरुन मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये भगवा फडकला त्यावेळी आनंद दिघे यांच्या कामाचे कौतुक केले होते असे देसाई म्हणाले. त्याचे काही व्हिडिओ अजूनही माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत असे देसाई म्हणाले. तसेच संजय राऊत हेच सर्वात मोठे गद्दार असून भाजप महायुती मधून निवडून येऊन देखील त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रवृत्त केल्याचे देसाई म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे जे बोलले ते संजय राऊत यांना मान्य नाही का?

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये भगवा फडकला त्यावेळी आनंद दिघे यांच्या कामाचे कौतुक केले होते असे देसाई म्हणाले. बाळासाहेब ठाकरे जे बोलले ते संजय राऊत यांना मान्य नाही का? असा सवाल शंभूराज देसाई यांनी केला आहे. एवढे संजय राऊत मोठे लागून गेले का? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचा असून संजय राऊत हेच सर्वात मोठे गद्दार असून भाजप महायुती मधून निवडून येऊन देखील त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रवृत्त केलं. त्यामुळे सर्वात मोठे गद्दार पहिले संजय राऊत असल्याचा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय? अशा पद्धतीने ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा राष्ट्रीय कट आहे असा थेट आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला. आपण हे आनंद दिघे यांचा आदर ठेऊन बोलत आहोत असंही राऊत म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांचे नेते हे नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत असा टोला राऊत यानी लगावला. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिंदे गट ज्या जाहिराती करतो त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखाएवढाही नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला तुम्ही शिवसेना जिल्हाप्रमुखाचा फोटो लावता? तुम्हाला बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड कमी करायचा आहे का? बाळासाहेबांच्या बाजूला आणखी एक फोटो लावणे हा एक राष्ट्रीय कट आहे. बाळासाहेबांचे महत्व कमी करण्यासाठी तुम्ही या गोष्टी करताय हे जनता लक्षात ठेवते. आनंद दिघेंचा पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतोय?

महत्वाच्या बातम्या:

बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा

आणखी वाचा

Comments are closed.