मिचेल मार्शचा धमाका
ऑस्ट्रेलियाचा स्फोटृक अष्टपैलू मिचेल मार्शने टी-20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 1500 धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय सामने आणि विविध फ्रेंचायझी स्पर्धांमध्ये त्याने सातत्याने धावांचा पाऊस पाडत गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आहे. मोठे षटकार, आक्रमक स्ट्राइक रेट आणि दबावाखाली धावा काढण्याच्या क्षमतेमुळे मार्श सध्या जगातील सर्वात धोकादायक टी-20 फलंदाजांपैकी एक मानला जात आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी त्याचा हा फॉर्म ऑस्ट्रेलियासाठी मोठी ताकद ठरत आहे.
Comments are closed.