दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, राज्याला त्यांची उणीव जाणवेल, मिटकरींची भावूक प्रतिक्रिया

अमोल मिटकरी: महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने काही कठोर निर्णय कालबाह्य योजना बंद करणे किंवा त्यात काळानुरूप बदल करण्याचे सुतोवाच ते अर्थसंकल्प मांडताना करतील, अशी शक्यता आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळं अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले मिटकरी?

उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, पण यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. वर्षानुवर्षे ज्यांच्या अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जायचा, त्या अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल. कागदावर आकडे असतील, योजना असतील; पण दादांची दृष्टी, धडाडी आणि अनुभव यांची कमतरता मात्र उद्या दिसणार. दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.