नंबर ब्लॉक केला तरी वारंवार मेसेज आणि व्हिडीओ येत होते, हनी ट्रॅप प्रकरणी आमदार शिवाजी पाटील?
आमदार शिवाजी पाटील: सत्ताधारी पक्षासोबत असणारे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील (Shivajirao Patil) यांना अज्ञात महिलेने अश्लील व्हॉट्सॲप संदेश पाठवत 10 लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी पाटील यांनी ठाण्यातााील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणावर आता शिवाजी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला फोटो व्हिडीओ पाठवण्यात आले, मी ब्लॉक केले. तरीही वारंवार असे घडले. मी समोरच्या व्यक्तीला तक्रार करणार असल्याचे देखील सांगितल्याचे आमदार शिवाजी पाटील म्हणाले. पोलीस याबाबतचा तपास करतील. कोणचा राजकीय हेतू असेल तर त स्पष्ट होईल, कारण आता निवडणुका येत असल्याचे पाटील म्हणाले.
एक महिना सातत्याने मेसेज येत होते
हा हनी ट्रॅप प्रकार नाही. मी त्या व्यक्तीला पाहिलं नाही असे शिवाजी पाटील म्हणाले. मला गणपती नवरात्रमध्ये वेळ नव्हता म्हणून मी आता तक्रार केली. तक्रार केल्यानंतर अटक होईल. प्रत्येकवेळी मोबाईल बदलून नंबर बदलून फोटो व्हिडीओ पाठवण्यात आले. एक महिना सातत्याने मेसेज येत होते. अकाउंट नंबर देखील मी दिला आहे. पोलिसांनी मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅप प्रकरण चांगलच तापले होते
पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅप प्रकरण चांगलच तापलेले पाहायला मिळालं होतं. आता सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदाराला देखील हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवले जात असल्याची तक्रार ठाणे पोलिसात दाखल झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
महिलेने आमदारालाच पाठवले अश्लील मेसेज, केली 10 लाखांची मागणी, आमदाराची पोलीस ठाण्यात धाव
आणखी वाचा
Comments are closed.