राज्यातील उद्योग मराठी माणसांच्या थडग्यावर उभे राहून देणार नाही, अर्बन नक्सलचे गुन्हे दाखल करुन
राज ठाकरे भाषण: महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल, हा विचार करतो. महाराष्ट्रात कामधंदा येणाऱ्यांना मराठी कशी येईल, हा विचार मुख्यमंत्री करत नाही. मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि भूमीपूत्र यांचा विचार केला जात नाही, असे टीकास्त्र मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोडले. ते शनिवारी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याच्या व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गुजरातप्रेम अधोरेखित करत भाजपला लक्ष्य केले.
देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातला गेले. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असते. मग फक्त आम्ही त्याविषयी बोललं तर संकुचित कसे ठरतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आज रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी लागणारं मनुष्यबळ बाहेरच्या राज्यातून येत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार नाही, हे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रदेशात रस्ते आल्यानंतर तेथील राज्यकर्त्यांनी नीट लक्ष दिलं नाही तर तो प्रदेश बरबाद होतो. त्यामुळे रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही घेतली पाहिजे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर यांनी आंदोलन केले. त्याच्या बातम्या कुठेही छापून आल्या नाहीत. 20 हजार बिहारी लोकांना अल्पशे ठाकूरने हाकलून दिले. त्याला भाजपने आमदार केले. मग जेव्हा राज ठाकरे महाराष्ट्राविषयी बोलतो तेव्हा तो संकुचित कसा ठरतो? त्यामुळे मराठी लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. महाराष्ट्र विकला जाऊन देऊ नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
Raj Thackeray in Panvel: लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे आले आहेत: राज ठाकरे
शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे श्रीपाद अमृत डांगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते कम्युनिस्ट पक्षाचे होते. तेव्हा शिवसेना आणि कम्युनिस्टांमधून विस्तवही जात नव्हता. मात्र, त्यावेळचे राजकारणी मोठ्या मनाचे होते. आता राजकारण्यांची मनं संकुचित झाली आहेत. त्यावेळी श्रीपाद अमृत डांगे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर येणे म्हणजे, गव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. त्यानंतर आजची घटन म्हणजे आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले आहेत, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.
Urban Naxal: जनसुरक्षा कायद्यावर राज ठाकरेंची टीका
महायुती सरकारच्या बहुचर्चित जनसुरक्षा कायद्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. सरकारी प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवले जाईल. राज्य सरकारने कायदा आणला, तुम्ही कोण आहात, अर्बन नक्सल शहरांमध्ये राहणारे नक्षल. तुम्ही कोणत्या प्रकल्पाला विरोध केलात, तर सरकार तुम्हाला अटक करु शकतं, एकदा करुच देत. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहून देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसांचा सन्मान राखून आणावे लागतील, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=T99KYBCBUIM
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.