Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर…मुंबई महापालिकेसाठी रणनीती आणि बंडखोरी शमवण्यावर चर्चा
मुंबई महापालिका 2026 च्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)कडून आतापर्यंत अंतिम 53 जणांची यादी जाहीर (MNS Candidate List BMC Election 2026) करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटासोबत मनसेची युती आहे. या युतीमध्ये एकूण 227 जागांपैकी मनसे 53 जागा लढवणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट 163 जागा लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही 11 जागा देण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांच्यासह कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे, बबन महाडिक, मुकेश भालेराव यांच्यासह 53 जणांना संधी दिली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. (BMC Election 2026)
Comments are closed.