टीम इंडिया फायनलमध्ये जाणारच नाही, बोलणाऱ्या मोहम्मद आमिरच्या रिॲक्शनची चर्चा, VIDEO

मोहम्मद अमीर ऑन इंड विरुद्ध इंग्लीश T20 WC 2026 सेमीफायनल: टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत काल भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. दरम्यान, सुपर-8 च्या भारत आणि वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) टीम इंडियाचा पराभव होणार, असा दावा केला होता. त्यानंतर सेमीफायनलमध्येही टीम इंडियाला इंग्लंड पराभूत करेल, अशी भविष्यवाणी मोहम्मद आमिरने केली होती. मात्र टीम इंडियाने सुपर-8 चा सामनाही जिंकला आणि इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलही जिंकली. त्यामुळे सोशल मीडियावर मोहम्मद आमिरला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.

टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करुन फायनल गाठल्यानंतर मोहम्मद आमिरची पुन्हा प्रतिक्रिया आली आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडिया सेमीफायनलमध्ये नाही पोहोचणार नाही असा दावा तु केला होता. परंतु टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहचली व ती जिंकली आणि सेमीफायनल गाठली. त्यानंतर तु म्हणाला की, टीम इंडिया फायनलमध्ये नाही पोहोचणार, ती जिंकली आणि आता फायनलमध्ये पोहोचली. मग आता तुला काय म्हणालायचं आहे, असं अँकर मोहम्मद आमिरला म्हणाला. यावर मोहम्मद आमिर म्हणाला की, आज चांगल्याप्रकारचे क्रिकेट झाले आणि आज टीम इंडिया परिपूर्ण क्रिकेट खेळली. बाकी आधीचे टीम इंडियाचे सामने पाहाता इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया खूप चांगल्या प्रकार खेळली. त्यांना जेवढं क्रेडिट द्यावं, तेवढं कमी आहे, असं मोहम्मद आमिरने सांगितले.

…तर 1 षटकआधीच इंग्लंडने लक्ष्य गाठलं असतं- (Mohammad Amir On Ind vs Eng T20 WC 2026)

भारत आणि इंग्लंडच्या सामन्याआधी मी चांगला दावा केला होता. इंग्लंडने कॅच सोडल्या. तुम्ही एका फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाची कॅच सोडली, मग असंच होणार…जसप्रीत बुमराहला सोडलं तर दोन्ही संघाची खराब गोलंदाजी राहिली.  अक्षय पटेलने दोन चांगल्या कॅच पकडल्या, असंही मोहम्मद आमिर म्हणाला. जर अक्षर पटेलने कॅच पकडल्या नसत्या, तर 1 षटकआधीच इंग्लंडने लक्ष्य गाठलं असतं, असंही मोहम्मद आमिरने सांगितले.

भारत आणि इंग्लंडचा सामना कसा राहिला? (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026)

नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 7 बाद 253 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनला इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक यानं 15 धावांवर असताना जीवदान दिलं होतं. संजू सॅमसन यानं 89, इशान किशन यानं 18 चेंडूत 39 धावा केल्या. संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी केली.  शिवम दुबेनं 25 बॉलमध्ये 45, हार्दिक पांड्यानं 12 चेंडूत 27 धावा केल्या. तिलक वर्मानं 7 चेंडूमध्ये 21  धावा केल्या. भारतानं आजच्या डावात 19 षटकार मारले. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 7 बाद 246  धावा केल्या आणि भारतानं 7  धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

संबंधित बातमी:

Sakshi MS Dhoni Video Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026: बुमराहकडून एक टप्पा कॅच, साक्षी आनंदाने नाचू लागली; धोनीने लगेच खाली बसवले, रोहितही खळखळून हसला, VIDEO

Mohammad Amir Ind vs WI T20 WC 2026: वेस्ट इंडिज हरवणार, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणारच नाही बोलणारा मोहम्मद आमिर आता म्हणतो…

आणखी वाचा

Comments are closed.