मोहम्मद शमी IN, जसप्रीत बुमराह OUT…; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा असेल टीम इंडिया

न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर संघनिवडीभोवती मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शुभमन गिलची कर्णधार म्हणून संघात पुनरागमन जवळपास निश्चित मानलं जात असलं, तरी श्रेयस अय्यरच्या पुनरागमनावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, मार्च 2025 पासून संघाबाहेर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे संघात कमबॅक करू शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.

शमीचा वनडे संघात पुनरागमन?

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. द टेलिग्राफच्या अहवालानुसार, देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीचं फळ शमीला मिळू शकतं. शमीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2025 मध्ये खेळला होता. त्यानंतर इंग्लंड दौरा तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची घरच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती.

मात्र, आता शमीचं दीर्घ प्रतीक्षेचं दिवस संपण्याची चिन्हं दिसत आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शमीने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत 8 बळी घेत उत्कृष्ट लय दाखवली आहे. याचबरोबर, आगामी टी-20 वर्ल्ड कपचा विचार करून हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते, असंही बोललं जात आहे.

शुभमन गिलचं पुनरागमन जवळपास निश्चित

भारताचा नवा वनडे कर्णधार शुभमन गिल याची ही दुसरी वनडे मालिका असणार असून, तो संघात पुनरागमन करणार निश्चित मानले जात आहे. मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मानेला झालेल्या दुखापतीमुळे गिल खेळू शकला नव्हता. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने प्रथमच वनडे संघाचं नेतृत्व केलं होतं, मात्र त्या मालिकेत भारताला 1-2 अशी मालिका पराभवाची चव चाखावी लागली होती. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने पराभूत केलं होतं.

श्रेयस अय्यरवर अजूनही प्रश्नचिन्ह

दुसरीकडे, उपकर्णधार श्रेयस अय्यर या मालिकेत खेळणार जरा कठीण दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यानंतर अय्यर अनेक दिवस सिडनीतील रुग्णालयात होता. त्याची लवकरच पुनरागमन होईल, असं वाटत होतं, मात्र फिटनेसच्या कारणामुळे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस (COE) मध्ये आणखी एक आठवडा रिकव्हरी करण्याचा सल्ला त्याला देण्यात आला आहे. एकूणच, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा अनेक मोठ्या निर्णयांमुळे आणि कमबॅकच्या शक्यतांमुळे चर्चेत आहे.

भारत विरुद्ध न्यूजीलंड ODI आणि T20I मालिका शेड्यूल

  • 11 जानेवारी: पहिला ODI – वडोदरा
  • 14 जानेवारी: दुसरा ODI – राजकोट
  • 18 जानेवारी: तिसरा ODI – इंदौर

T20I मालिका :

  • 21 जानेवारी: पहिला T20I – नागपूर
  • 23 जानेवारी: दुसरा T20I – रायपूर
  • 25 जानेवारी: तिसरा T20I – गुवाहाटी
  • 28 जानेवारी: चौथा T20I – विशाखापट्टणम

31 जानेवारी: पाचवा T20I – तिरुवनंतपुरम

न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ (India’s ODI Squad for New Zealand Series)

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

आणखी वाचा

Comments are closed.