मान्सूनचे ढग गायब, पावसाचा पत्ता नाही! पिके करपली, बळीराजा चिंतेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशातील 90 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब झाले आहेत. त्यामुळे पिके करपली असून बळीराजा चिंतेत सापडला आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची तीव्रता कमी झाली असताना आंबोलीसह पश्चिम घाटाच्या पट्ट्यात मात्र पावसाने सरासरी गाठली आहे. देशातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस आंबोलीत झाला आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांची खरीपाची पिके संकटात सापडली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांच्याही चाऱ्यापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही स्थिती 13 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर मात्र राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बळीराजाचे डोळे आभाळाकडे… बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

बैलपोळ्याचा सण अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे. वर्षभर काळ्या मातीत राब-राब राबणाऱ्या सर्जा-राजाच्या कोड-कौतुकाचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी दिवाळसणापेक्षा कमी नसतो; परंतु वरुणराजाने रुसवा धरल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. परिणामी संपूर्ण ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून, बाजारपेठेत अजूनही सामसूम असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

Comments are closed.