बुलेट ट्रेनच्या वेगानं सेन्सेक्स कमबॅक करणार, 1 लाखांचा आकडा पार करणार, कुणाची भविष्यवाणी?
मुंबई :अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणामुळं जगभरात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कॅनडावर 50 टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय. याशिवाय त्यांनी मेक्सिको आणि चीनवर देखील कर लादण्याची घोषणा केलीय. भारतासोबत ते रेसिप्रोकल टॅक्स म्हणजे परस्पर शुल्क आकारणार आहेत. याचाच अर्थ भारत जितका कर अमेरिकन वस्तूंवर लावेल तितका कर अमेरिका भारतावर लावेल. सध्या जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळं शेअर मार्केटवरील दबाव वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आर्थिक मंदीचं संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळं जगभरातील बाजारांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. सप्टेबंर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचं भीतीचं वातावरण आहे. हे सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु असल्यानं गुंतवणूकदार घाबरल्याचं पाहायला मिळतं. मॉर्गन स्टॅनली या संस्थेच्या मतानुसार भारताचा सेन्सेक्स येत्या काळात 100000 चा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.मॉर्गन स्टॅनलीच्या अंदाजानुसार येत्या काळात सेन्सेक्समध्ये 41 टक्के तेजी पाहायला मिळेल. डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्स 105000 च्या पार जाण्याची शक्यता आहे. जर स्थिती सामान्य राहिली तर सेन्सेक्स 93000 अंकांपर्यंत जाईल. सध्याच्या तुलनेत 25 टक्के वाढ अपेक्षित ठेवण्यात आली आहे.
तर सेन्सेक्स 70 हजारांपर्यंत घसरणार
जर आर्थिक मंदीचं सावट वाढलं तर सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळेल. मॉर्गन स्टॅनलीच्या मतानुसार स्थिती बिघडल्यास सेन्सेक्समध्ये 6 टक्के घसरण होऊ शकते. सेन्सेक्स अशा परिस्थितीत 70000 पर्यंत येऊ शकतो. भारत रिसर्चचे प्रमुख रिद्धम देसाई यांनी माध्यमांना सांगितलं की बाजारात विक्रीचा मूड दिसत आहे. मात्र, गुंतवणूकदारांसाठी चांगला वेळ असू शकतो, असंते म्हणाले.
मॉर्गन स्टॅनलीच्या पसंतीच्या स्टॉक्समध्ये ज्यूबिलंट फूडवर्क्स, एम अँड एम, मारुती सुझुकी, ट्रेंट, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस या सारख्या शेअर्सचा समावेश आहे. या स्टॉक्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळू शकते. लाँग टर्म गुंतवणुकीसाी हा चांगला पर्याय असू शकतो. मॉर्गन स्टॅनलीच्या मतानुसार भारत जगातील सर्वात मोठं ग्रोथ मार्केट आहे. इथं येणाऱ्या काळात गुंतवणुकीची चांगली संधी आहे. सध्या बाजारात अस्थिरता असली तरी चांगल्या रणनीतीनं गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळू शकतात.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.