मातांच्या किडनीदानाने 37 मुलांना जीवनदान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे मागील नऊ वर्षांत 36 मातांनी आपल्या मुलांना किडनी दान करून नवजीवन दिले आहे. आज मातृदिनी  या निःस्वार्थ मातांच्या त्यागाला सॅल्युट केला जात आहे.

मातृत्वाचा सर्वोच्च अर्थ या महिलांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे.  डायलिसिसच्या थकवणाऱया प्रवासात आणि अनिश्चित भविष्यात आईने मुलांना आधार दिला आहे. मुलांच्या जगण्यापेक्षा आणखी काय मोठं असू शकते… हाच मातेचा ध्यास असतो.

सावली सोळंकी यांचं पहिलं किडनी दान

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुरुवात 4 एप्रिल 2018 रोजी झाली, तर पहिल्या मातेचे किडनीदान हे 9 जून 2018 मध्ये झाले. बैतूल जिह्यातील छाया सोळंकी या मातेने शुभम सोळंकी या आपल्या मुलाला किडनी दान केली होती. सुपरमध्ये आतापर्यंत तब्बल 70 किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, यात सर्वाधिक 37 मातांनी किडनी दान केली आहे, अशी माहिती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी दिली.

2018 पासून रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असून, आतापर्यंत २७ मार्च 2026 पर्यंत 70 मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यात सर्वाधिक ३६ मातांनी किडनी दान केले आहे.

डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी रुग्णालय.

Comments are closed.