पवार साहेबांनी स्टेट्समनशीपचं उत्तम उदाहरण घालून दिलं, राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर

अमोल कोल्ह: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ही वैयक्तिक भूमिका नक्कीच असू शकते. परंतू दिल्लीत होऊ घातलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत हा कार्यक्रम होता. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक चांगलं उदाहरण घालून दिलं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण न आणता कुठेतरी त्यापलीकडेही बघितलं पाहिजे. किंबहुना स्टेट्समनशीपसाठी महाराष्ट्र ओळखला जातो. त्यामुळे संजय राऊत साहेबांचे हे वैयक्तिक मत असून त्यामागचं कारणही स्वाभाविक आहे. त्यात काही गैर असल्याचे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

दिल्ली येथे पार पडत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. या सत्कारावरून खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना खडेबोल सुनावले आहेत. यावर अमोल कोल्हे बोलत होते.

स्टेट्समनशीपचा आदर्श पवार साहेबांनी घालून दिला- अमोल कोल्हे

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, शरद पवारांना हा सोहळा टाळता आला असता. यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः शरद पवार साहेब आहेत. या साहित्य संमेलनात काही मंडळी काम करत असताना त्यांच्या मागे शरद पवार साहेब स्वागताध्यक्ष म्हणुन खंबीरपणे उभे आहेत. किंबहुना यात कुठलेही राजकारणा आणता  स्टेट्समनशीपचा आदर्श पवार साहेबांनी घालून दिला हे मला महत्वाचं वाटत असल्याचे ही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

‘ही’ भावना मला जास्त आनंददायी

पुढे बोलताना संजय राऊत यांनी मराठी साहित्य संमेलनावर ही घणाघाती टीका केली असून दिल्लीतल्या साहित्य संमेलन नसून ते दलालांच संमेलन आहे. काल शिंदेंचा सत्कार नाहीतर पवारांनी अमित शाहांचा सत्कार केला. गद्दारांना पुरस्कार देणे हे योग्य नसल्याचेही खासदार राऊत म्हणाले. दरम्यान यावर खासदार अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, याबद्दल राऊत साहेबांना काय माहिती आहे याबद्दल मला कल्पना नाही. मात्र मी स्वतः एकदा दिल्लीतील साहित्य संमेलनात गेलो होतो तेथील मराठी भाषिकांचा उत्साह मी बघितला आहे. खरंतर हा सर्व कार्यक्रम कौतुकास्पद आहे. किंबहुना राज्याबाहेर जे जे मराठी भाषिक आहे ते मराठी भाषेचे ब्रँड अँबेसिडर आहे.  त्यामुळे त्यांच्या मनात आनंदाची भावना असून ही भावना मला जास्त आनंददायी असल्याचेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

ही कृतज्ञतेची भावना असू शकते-  खासदार अमोल कोल्हे

ज्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना तोडली त्यांचा सत्कार करणे   हे पटलं नसून शरद पवारांनी एक प्रकारे अमित शाहांचा सत्कार केल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. त्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे. या दोन राजकीय गोष्टी असून स्वतः शरद पवार साहेबांनी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले आहेत. तसेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीही हे प्रयत्न कायम ठेवले, त्यामुळे ही कृतज्ञतेची भावना असू शकते असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

ती संजय राऊत स्टाईल

पुढे बोलताना संजय राऊत यांनी मिश्कील शब्दात शरद पवारांच्या कृतीवर भाष्य करताना, राजकारण आम्हालाही कळत असल्याचे म्हटले होते, यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की ती संजय राऊत स्टाईल आहे. मुळे प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याचे काही कारण नाही. असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=bjeyvtkd98s

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.