आयपीएल 2027 मध्ये धोनी मेंटॉर की खेळाडू? झहीर खानच्या आगमनानंतर सीएसकेने केलं कन्फर्म!

सुपर किंग्जमध्ये सोमवारी (21 सप्टेंबर) अनेक घडामोडी घडल्या. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि जोबर्ग सुपर किंग्ज संघांचे मुख्य प्रशिक्षक निश्चित झाले. एल्बी मॉर्केलने जोबर्ग सुपर किंग्जच्या, तर झहीर खानने चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदांची जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे आयपीएल 2027 च्या हंगामात एमएस धोनी सीएसकेमध्ये कोणत्या भुमिकेत असणार हे स्पष्ट झाले आहे.
सीएसकेने मंगळवारी स्पष्ट केले की धोनी आगामी हंगामात संघासाठी खेळाडू म्हणून खेळेल. मागील काही रिपोर्ट्समध्ये असे म्हणण्यात आले होते की, धोनी माजी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेईल किंवा संघासोबत मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून काम करेल. आता सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी संकेत दिले की, धोनी अशी कोणतीही भूमिका बजावणार नाही.
धोनी-फ्लेमिंग जोडीने सीएसकेला अनेक विजेतेपद मिळवून दिली आहेत. फ्लेमिंगने पाच वेळेच्या चॅम्पियन संघासोबत वेगळे होण्याची घोषणा जुलैमध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. तसेच झहीरच्या नियुक्तीमागे धोनीच आहे. धोनीने सीएसकेसोबत पहिल्या हंगामापासून असून त्याने अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.
विश्वनाथन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “तो (धोनी) एक खेळाडू म्हणून उपलब्ध आहे.”
फ्लेमिंग यांच्यानंतर सीएसकेला एका भारतीयावर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवायची होती आणि तसे झालेही. झहीरने आयपीएलचे 100 सामने खेळले आहेत. तसेच त्याने निवृत्तीनंतर 2024 मध्ये लखनौ सुपर जायंसट्सचे मार्गदर्शक म्हणून काम केले. आता तो सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक आहे.
धोनी मागील हंगामात खेळला नाही
धोनी आयपीएल 2026 हंगामातील एकही सामना खेळला नाही. पायाच्या दुखापतीमुळे तो संपुर्ण हंगामाला मुकला होता. तसेच तो घरच्या अनेक सामन्यांवेळी हॉटेलमध्ये होता आणि त्यामुळे त्या सामन्यांना अनुपस्थितही होता. सध्या सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. (MS Dhoni as mentor or player in IPL 2027? CSK confirms following Zaheer Khan Takes Head Coach Charge)
Comments are closed.