मुंबई हादरली! बोलत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका तरुणाने 16 वर्षीय मुलीवर तिच्या ओळखीच्या मुलाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या मित्रावरही हल्ला करण्यात आला आहे.आशिष बनसोड असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलुंड हल्ल्याची घटना (Mulund Crime Incident)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूर येथील रहिवासी असून एकमेकांना ओळखत होते. काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने आरोपीशी बोलणं बंद केलं होते. याच रागातून आरोपीने मुलुंडमध्ये तिच्या कॉलेजजवळ तिला गाठलं आणि सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही त्याने गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली.

आरोपी अटकेत (Police Action Mumbai)

या घटनेनंतर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला कोयत्यासह अटक केली आहे. आशिष बनसोड याच्यावर यापूर्वीही बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास मुलुंड पोलीस करत आहेत.

महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न (Women Safety Concern)

ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर समाजातील वाढत्या असुरक्षिततेची, विशेषतः महिलांविरोधातील हिंसेची भीषण वास्तवता दाखवणारी आहे. एका मुलीने बोलण्यास नकार दिल्याने तिच्यावर अशा प्रकारे हल्ला होतो, ही बाब मन हेलावून टाकणारी आहे.

वाढती गुन्हेगारी आणि गरज कडक उपाययोजनांची (Crime Against Women)

मुंबईसारख्या शहरात अशा घटना सातत्याने घडत असून ही चिंतेची बाब आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक कायदे, पोलिसांची सतर्कता आणि समाजातील जागरूकता वाढवणे अत्यावश्यक आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा

Comments are closed.