बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव, शशांक रावांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मुंबई सर्वोत्तम निवडणुकीचा निकालः दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. या निवडणुकीतील 21 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळवत शशांक राव पॅनेलने घवघवीत यश मिळवले. तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागांवर यश मिळाले. मात्र, या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या पार्श्वभूमीवर शशांक राव यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. ब्रँड अनेक असतात. पण जो कामगार आणि जनतेच्या हिताचं काम करेल, तोच टिकतो. तुम्ही एकटे असाल तरी लोक तुम्हाला निवडून देतात. हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीने दाखवून दिले, असे शशांक राव यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शशांक राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे आभार मानले.
आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही. 1946 पासून आमची संघटना आहे. यामध्ये अनेक नेते होते. जॉर्ज फर्नांडिस या संघटनेचे अध्यक्ष होते, शरद राव या संघटनेचे सरचिटणीस होते. आमची संघटना कामगारांसाठी काम करते. मी भाजपमध्ये असल्याने त्या पक्षाचा विचार मानतो. कामगार संघटनांचा हेतू एकच असतो, ते कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेतात. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी कामगारांसाठी आम्हाला नेहमीच मदत केली आहे. त्याचा फायदा आम्हाला निश्चित होतो, असे शशांक राव यांनी सांगितले.
Shashank Rao: शशांक रावांचा ठाकरे बंधूंना टोला
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागा जिंकल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी भाष्य करताना ठाकरे बंधूंनी म्हटले की, आम्ही कामगारांच्या हिताचं काम करतो. कोणीही एकत्र आलं तरी आणि त्यांनी कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचे म्हणतात. पण ते 9 वर्षे बेस्ट पतपेढीत होते. याशिवाय, ते 25 वर्षे बेस्ट समितीत होते. या काळात निवृत्त होऊन तीन वर्षांनतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळाली नव्हती. सुहास सामंत या कमिटीत होते तेव्हा कामगारांच्या ग्रॅच्युईटीचा पैसा ज्याला हात लावायचा नसतो, ते पैसाही ठेकेदारांना वाटण्यात आला. त्यामुळे सुहास सामंत यांनी इतरांवर आरोप करु नयेत, असे शशांक राव यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी 2017 मध्ये बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हे आश्वासन पाळले नाही. बेस्टच्या स्वमालकीच्या 250 गाड्या शिल्लक होत्या. आम्ही 2019 साली एमओयू केला होता, बेस्टने स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या पाहिजे. शिवसेनेकडे कमिटी आणि महानगरपालिका असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही बेस्टसाठी एकही बसगाडी विकत घेण्यात आली नाही. उद्धव ठाकरे फक्त कॉन्ट्रॅक्ट देत राहिले, असा आरोप शशांक राव यांनी केला.
https://www.youtube.com/watch?v=777ult8jmv9k
आणखी वाचा
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? ‘या’ गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला
बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय झालं?
आणखी वाचा
Comments are closed.