मुंबईत मोठा जीएसटी घोटाळा! विक्रोळीत 10/10च्या खोलीत राहणाऱ्या संतोष लाेंढेंना 10 कोटींची नोटीस
मुंबई: आपला भारत देश सध्या दहशतवादाविरोधात लढा देत आहे, पण देशात राहून देशाशीच गद्दारी करणाऱ्यांचं काय? देशाच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांची संख्याही कमी नाही. जीएसटी चोरीचे नवनवे घोटाळे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच एक मोठा जीएसटी घोटाळा मुंबईत समोर आला आहे. चोर कोणी दुसरंच, आणि शिक्षा भोगतोय कोणी दुसराच! पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण? पाहूया सविस्तर..
नेमकं प्रकरण काय?
विक्रोळीतील झोपडपट्टीत 10 बाय 10 च्या घरात राहणारे संतोष विठ्ठल लोंढे यांना तब्बल 10 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस आली आहे. घर पाहिलं तर कोणीही म्हणेल, हे तर एका गरीबाचं घर! पण कागदांवर ते एक कोट्यधीश व्यापारी म्हणून नोंदले गेले आहेत. वास्तविकता मात्र काही औरच आहे.
संतोष लोंढे यांच्या नावावर ‘Santosh Enterprise’ नावाची फर्जी कंपनी सुरू करण्यात आली. त्यासाठी त्यांच्या आधार व पॅन कार्डाचा गैरवापर करण्यात आला. ही कंपनी मीरा रोड येथील एका पत्त्यावर रजिस्टर करण्यात आली, पण प्रत्यक्षात तिथे कोणतंही ऑफिसच नाही. या कंपनीच्या नावावर तब्बल ₹61.5 कोटींचा बनावट टर्नओव्हर दाखवण्यात आला, ज्यात ₹10.02 कोटींचा कर समाविष्ट आहे. MGST आणि CGST अधिनियम 2017 च्या कलम 132 (1) (b), (c), (l) आणि (i) नुसार, लोंढे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात फसवणूक करून मिळवलेला इनपुट टॅक्स क्रेडिट ₹5 कोटींहून अधिक असल्यामुळे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो.
खरे गुन्हेगार कोण?
या संपूर्ण फसवणुकीमागे महेश कांबळे आणि राहुल पटेल या दोघांनी संतोष लोंढे यांचे कागदपत्रे घेतल्याची माहिती समोर आली आहे.यानंतर मीरा रोड येथील पत्त्यावर ही कंपनी रजिस्टर करण्यात आली. मात्र त्या पत्त्यावर प्रत्यक्षात कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही.जेव्हा संदीप लोंढे यांच्याशी संवाद साधण्यात आला, तेव्हा आम्ही मीरा रोडच्या दिशेने निघालो, कारण सरकारी कागदपत्रांमध्ये “Santosh Enterprises” चे कार्यालय तिथे दाखवले आहे.पण जेव्हा आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंह तिथे पोहोचले, तेव्हा कळालं की हे ऑफिस फक्त कागदांवरच आहे, प्रत्यक्षात असा कोणताही कार्यालय तिथे नाही.
या संपूर्ण प्रकरणामागे महेश कांबळे आणि राहुल पटेल यांची नावं समोर आली आहेत. त्यांनी संतोष लोंढे यांची कागदपत्रे मिळवून ही फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालं आहे. मात्र, अजूनही ते मोकाटच आहे.मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार एक गोष्ट तरी स्पष्ट झाली आहे .कायदा केव्हा बनेल ते पुढचं पाहू, पण एक सामान्य माणूस आणि त्याचं कुटुंब यामध्ये अडकून पडलंय.मुंबईतील एका सामान्य व्यक्तीला जीएसटी चोरीच्या जाळ्यातून कोण वाचवेल?या चोरट्यांची साखळी कोण तोडेल?
आणखी वाचा
Comments are closed.