गार्मेंट कारखान्यात दोघं चर्चा करत असताना आला अन्…; डोळ्यात मिरची पूड टाकली, चाकूने सपासप वार
मुंबई: मुंबईतून गुन्ह्याची हादरवणाऱ्या (Mumbai Crime News) घटना समोर आल्या आहेत. धारावीच्या मेन रोडवरील गार्मेंट कारखान्यात २३ वर्षीय तरुणाची पूर्ववैमन्यसातून हत्या (Mumbai Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. मिरचीची पूड डोळ्यात टाकून आरोपीने मृत तरुणावर चाकूने हल्ला (Mumbai Crime News) केला. धारावीच्या पुनावाला चाळमधील गार्मेट कारखान्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. अरमान रमजान शहा २३ असे मृत तरुणाचे नाव असून तो त्याच गार्मेंटमध्ये काम करत होता.(Mumbai Crime News)
Mumbai Crime News: नेमकं काय घडलं?
बुधवारी सायंकाळी अरमान हा गार्मेंटमध्ये काम करत असताना, आरोपी साहिल कुमार त्या ठिकाणी आला. यावेळी साहिलने अरमान याला चर्चा करण्यासाठी बोलावून घेतलं, दोघं चर्चा करत असताना साहिलने अचानक अरमानच्या डोळ्यात खिशातून आणलेली मिरचीची पूड टाकली. यावेळी अरमान डोळे चोळत असताना साहिलने सोबत आणलेल्या चाकूने (Mumbai Crime News)अरमानवर असंख्य वार केले. या हल्यानंतर (Mumbai Crime News) साहिल पळून गेला अरमानला उपचारासाठी जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले असता अतिरक्तस्त्राव झाल्याने अरमानला डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. धारावी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसानी साहिलवर हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.(Mumbai Crime News)
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत कळाले की, आरोपी साहिल आणि मृत अरमान यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. कामाच्या ठिकाणी झालेल्या किरकोळ भांडणातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी कारखान्यातील इतर कामगारांचे जबाब नोंदवले असून, सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.अरमानच्या मृत्यूमुळे सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, एका क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे धारावी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे.(Mumbai Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.