मुंबईच्या ओशिवरा परिसरात एका इमारतीवर गोळीबार, आरोपी फरार, परिसरात भीतीचं वातावरण

मुंबई क्राईम न्यूज : मुंबईच्या ओशिवरा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने इमारतीवर गोळीबार केला आहे. ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नालंदा सोसायटीवर हा गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करुन आरोपी फरार झाले आहेत. सुदैवाने या गोळीबारामध्ये कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

मुंबई शहरात गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण

घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत इमारतीमध्ये असलेली सीसीटीव्ही त्यासोबत तांत्रिक तपास करून आरोपीचे शोध घेत आहेत. मात्र, मुंबई शहरात गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.

भाजप आमदार महेश चौगुले समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक केली

भाजप आमदार महेश चौगुले समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक करत गोंधळ घातला आहे. त्यानंतर माजी महापौर विलास पाटील पत्नी माजी महापौर प्रतिभा विलास पाटील मुलगा मयुरेश पाटील व आपल्या समर्थकांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले आणि त्या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे. मात्र त्यानंतर पोलीस बंदोबस्त त्यांना झाले आणि भाजप कार्यालय देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याने तेथे भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर भाजप समर्थकांकडून जोरदार दगडफेक व काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. पोलीस मोठ्या संख्येने परिसरात तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे.

महत्वाच्या बातम्या:

नांदेड येथील गोळीबार प्रकरण! पोलिसांनी 10 आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या 24 तासात केले जेरबंद

आणखी वाचा

Comments are closed.