धक्कादायक! मुंबईत अनधिकृत भाजीवाल्यांच्या दोन टोळीमध्ये तुफान हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू
मुंबई क्राईम न्यूज : मंबईतील गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर अनधिकृत भाजीवाल्यांच्या दोन टोळीमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारी मध्ये एका भाजी विक्रेताचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोरेगाव पश्चिम स्टेशन बाहेर बेस्ट डेपो च्या समोर भर दिवसा अनधिकृत भाजीवाल्यांच्या एका टोळी कडून एकाची हत्या केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हल्ला करणारे आई-वडील आणि मुलगा असा तिघांना अटक केली आहे.
गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाल्यांचे साम्राज्य
अटक केलेल्या आरोपीचे नाव मुकेश ब्रिजमोहन कोरी, ब्रिज मोहन देवताप्रसाद कोरी वय 52 वर्ष, सुशीला ब्रिजमोहन कोरे वय 48 वर्ष आहे. एक भाजीवाल्याचा टोळी कडून दुसरा भाजीवाल्याच्या टोळीला सातत्याने डिवचण्याचा जुना राग धरून हा वाद विवाद होऊन यात एका व्यक्तीचा हत्या करण्यात आली आहे. मात्र गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाल्यांचे साम्राज्य आहे. या अनाधिकृत फेरीवाल्यांचा विरोधात अनेक तक्रारी करून देखील मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जात नसल्याचे आरोप स्थानिकांनी केली आहे.
हाणामारीची घटना घडल्यानंतर स्थानिककडून मुंबई महानगरपालिका विरोधात मोठी नाराजी
अनधिकृत फेरीवाल्यांकडून हाणामारीची घटना घडल्यानंतर स्थानिककडून मुंबई महानगरपालिका विरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून या अनधिकृत फेरीवालेवर कारवाई केली जात नसल्यामुळे एवढा दादागिरी वाढली असल्याची आरोप देखील केली जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.