वयोवृद्ध महिलेला बांधलं अन् धारदार शस्त्राने गळ्यावर….; वांद्र्यातील घटना, पोलिसांकडून तपास स

मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्र्यात एका महिलेला बांधून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे (Mumbai Crime News). घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेखा खोंडे असे या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. आज (मंगळवारी, ता- 11) सकाळी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर वांद्रे पोलिस रिक्लेमेशन डेपो कांचन बिल्डिंग येथे पोहचले. मारेकऱ्यांनी रेखा खोंडे यांचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने (Mumbai Crime News) वार करून त्याची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. रेखा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Mumbai Crime News)

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर ही हत्या का केली गेली याचा पोलिस शोध घेत आहेत. महिलेला बांधून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून क्रूर पद्धतीने जीव घेण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

मालाडमध्ये प्रियकर आणि पत्नी मिळून केली पतीची हत्या

मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात प्रियकर आणि पत्नी मिळून पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, पत्नीने प्रियकराच्या मदतीने घरामध्ये पतीला दारू पाजून चाकूने वार करून हत्या केली आहे. यानंतर आरोपी पत्नी आणि प्रियकर पती हरवल्याचा तक्रार देण्यासाठी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. पोलिसांनी तक्रार दाखल करताना आरोपी पत्नी आणि प्रियकरावर संशय झाला आणि त्यांनी या संदर्भात सखोल चौकशी करून आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून पतीच्या हत्या करणारा प्रियकर आणि पत्नीला अटक केली आहे.

राजेश चौहान आणि पत्नी पूजा मालाड मालवणी परिसरात राठौडी गावात आपल्या दहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासोबत राहत होती. शेजारी राहणारा इमरान मन्सुरी सोबत पत्नी पूजा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने पत्नीने पतीला अडसर नको म्हणून आपल्या घरातच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली, हत्या करून बाईक वरून पतीला या दोन्ही आरोपीने जंगलात फेकून दिले. यानंतर पोलिसात पती हरवल्याचा बनाव करत तक्रार करण्यासाठी दोन्ही आरोपी मालवणी पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपीकडून अधिक तपास मालवणी पोलीस करत आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.