लैंगिक शोषण करत फोटो अन् व्हिडीओ काढले अन्…; मुंबईतील पाम्स व्हिलामध्ये काय घडलं?
मुंबई क्राइम न्यूज मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना (Mumbai Crime News) समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगावच्या रॉयल पॉम व्हिला, आरे कॉलनी येथे आयोजित केलेल्या पार्टीत आरोपीने हे कृत्य केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
मुलीवर अत्याचार करताना आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलही केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. मागील दोन वर्षांपासून आरोपी मुलीला हे अश्लील व्हिडीओ फोटो दाखवून शारिरीक संबध ठेवण्याबाबत जबरदस्ती करत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे.
ओशिवरा पोलीस स्थानकांत तक्रार दाखल-
मानसिक तणाव आणि रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर 17 वर्षीय मुलीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अजिम रहिम खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.