बाबा सिद्दीकींचा मोबाईल नंबर अचानक दिल्लीत ॲक्टिव्ह झाला अन् मुंबई पोलीस चक्रावले, नेमकं काय घड

बाबा सिद्दीक खून प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरु असताना आता एक नवीन माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी विजयादशमीच्या दिवशी वांद्रे (Bandra) परिसरात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी (Lawrence Bishnoi gang) संबंधित गुंडांनी गोळ्या घालून बाबा सिद्दीकी यांच्या हत्या (Baba Siddique Firing) केली होती. या हत्येमुळे मुंबईत खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांपैकी काही जणांना अटक केली होती. परंतु, सिद्दीकी यांच्या हत्येमागील खरा सूत्रधार आणि इतर गोष्टींचा पूर्णपणे उलगडा झाला नव्हता. अशातच आता या हत्याप्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीवरून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपी दिल्ली परिसरातील बुराडी येथील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही सायबर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने बाबा सिद्दीकी यांचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डमध्ये (Mobile SIM) सुरू करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुंबईत त्याच्याविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक प्रकरण मुख्य दंडाधिकारी न्यायालय क्रमांक 37 व दुसरे बोरीवली न्यायालय क्रमांक 17 येथे सुरू आहे. बोरीवली येथील प्रकरणात आरोपीला जामीन मिळाला होता.

Baba siddique mobile SIM card: बाबा सिद्दीकींचा मोबाईल नंबर वापरुन फसवणुकीचा डाव

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुटुंबियांनी बाबा सिद्दीकी यांचा मोबाइल क्रमांक सुरूच ठेवला आहे. हा मोबाइल क्रमांक सिद्दीकी कुटुंबीयांच्या व्यवसायाशी संलग्न ठेवण्यात आला आहे. 24 जून रोजी दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने एक ई-मेल आला होता. त्यात बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल क्रमांकासाठी अधिकृत स्वाक्षरी हक्काबाबत विचारणा करण्यात आली होती. या मेलबरोबर शेहझीन सिद्दीकी यांचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, वस्तू सेवा क्रमांक (जीएसटी) आणि कुटुंबाच्या कंपनीचे लेटरहेडही वापरले होते.

आरोपीने मोबाईल दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करून त्याद्वारे फसवणूक करण्याचा कट रचला होता. पण कंपनीने संबंधित व्यक्तीचा अर्ज प्राप्त झाल्याचे ई-मेलद्वारे कळवले होते. कंपनीने बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉ. अर्शिया यांना देखील ई-मेलच्या सीसी मध्ये ठेवले होतते. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. याबाबत डॉ. अर्शिया यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) ( फसवणूक करणे), ६२ (कैदेस पात्र असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न), ३३५ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ३३६ (२) व ३३६ (३) (दस्तऐवजांचे बनावटीकरण), आणि ३४०(२) (बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदी खऱ्या असल्याचे भासवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

https://www.youtube.com/watch?v=ts4byeujwas

आणखी वाचा

बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी पंजाबमध्ये सापडला, भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या ताब्यात

आणखी वाचा

Comments are closed.