मुंबईत कॅबचालकाकडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर कार नेली अन्….

मुंबई गुन्हेगारीच्या बातम्या: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिला कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. कारण राज्याची राजधानी मुंबईत पुन्हा एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या (Crime News) घटनेने हादरली आहे. यात एका कॅबचालकाकडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना  उजेडात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या कॅबचालकाला दादर पोलिसांनी अटक केली आहे. श्रेयांस पांडे असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तर आरोपी श्रेयांस पांडेनं या एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर गाडी बिघडल्याची थाप मारून मोबाइल बघण्याच्या बहाण्याने मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाईही केली जात आहे. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

ईस्टर्न एक्स्प्रेसवेवर निर्जनस्थळी कार नेली अन्….

पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी बुधवारी उन्हाळी शिबिरासाठी घराबाहेर गेली होती. तिने संध्याकाळी 4.30 च्या सुमारास घरी येण्यासाठी एका खासगी अॅप आधारित कंपनीची गाडी बुक केली. या गाडीचा चालक श्रेयांस पांडे (23) याने गाडी नमूद पत्त्यावर न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावर नेली. दरम्यान, यावेळी एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर त्याने गाडी बिघडल्याची थाप मारून मोबाइल बघण्याच्या बहाण्याने मुलीसोबत गैरवर्तन केलं. हा प्रकार लक्षात येताच मुलीने आपल्या वडिलांना फोन लावला आणि घटनेची माहिती दिली. मात्र यानंतर चालक पांडे मुलीला घराजवळील काही अंतरावर सोडून पळून गेला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चालक श्रेयांस पांडेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस नियुक्त करणे योग्य निर्णय

मुंबईच्या सुरक्षेसाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस नियुक्त करणे हा गृह खात्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य निर्णय आहे. मुंबईसारख्या मोठ्या आणि संवेदनशील शहरासाठी मजबूत आणि स्वतंत्र इंटेलिजन्स यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे मत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम

यांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय मुंबईतील गुन्हेगारी व सुरक्षा आव्हानांवर जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्यास मदत करेल. यामुळे मुंबईतील जनतेची सुरक्षितता अधिक बळकट होईल आणि गुन्हेगारीवर नियंत्रण अधिक कडक होईल. असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले आहे की, मुंबईसाठी हा पाऊल अत्यंत आवश्यक होता आणि यामुळे शहराच्या सुरक्षेत मोठा बदल होणार आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.