मुंबईत कॉलेजच्या विद्यार्थिनीने गळ्याला दोर लावला; तीन महिन्यांनी धक्कादायक कारण समोर, CCTV अन्

मुंबई: मुंबईतील मशीद बंदर (Mumbai Crime News) परिसरात राहणाऱ्या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी काल (शनिवारी) 20 वर्षीय प्रियकर सोहम बेंगडे याला अटक केली आहे. या तरूणीने 8 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मुलीच्या मोबाईलवरील मेसेज पाहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. मृत मुलगी चर्नीरोड येथील महाविद्यालयात (Mumbai Crime News) बँकेशी संबंधीत पदवीधर शिक्षण घेत होती. तरूणीने 8 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. (Mumbai Crime News)

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी मशीद बंदर येथे पालकांसोबत राहत होती. तिच्या वडिलांचा बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे. तर आई गृहिणी आहे. तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी 20 वर्षीय आरोपी प्रियकराला पायधुनी पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणी आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती उपायुक्त मोहित गर्ग यांनी दिली.(Mumbai Crime News)

8 मे रोजी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी आली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मुलीला दूरध्वनी केला. पण मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांना घरी जाऊन मुलीला आपल्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी शेजाऱ्यांनी पाहिले असता तिने घरात गळफास घेतला होता. तातडीने मुलीला जवळच्याच नूर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. काही दिवसांनी मुलीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिले असता आरोपी सोहम बेंगडे आणि एका मैत्रिणीसह त्यांच्या घरात डोकावत असल्याचे दिसून आले.

कुटुंबियांनी तिचे मेसेज तपासले असता….

मुलीच्या मोबाईलमधील कॉल लॉग तपासले. त्यावेळी बेंगडेने आत्महत्येच्या दिवशी अनेकवेळा दूरध्वनी केला होता. तसेच त्यांच्या मैत्रिणीने अनेक मिस्ड कॉल्स केल्याचे आढळले. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या परिचीत होता. त्यानंतर कुटुंबियांनी तिचे मेसेज तपासले असता आरोपी व मृत तरूणीचे संभाळण दिसून आले होते. तरूणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यांच्या संदेशातून ते स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून  बेंगडे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम कलम 108(आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.