मुंबईत कस्टम्स अधीक्षकानं मागितली 10 लाख रुपयांची लाच, सीबीआयकडून अटक

मुंबई गुन्हेगारीच्या बातम्या: सीबीआयने मुंबईतील सहार येथील एअर कार्गो कॉम्प्लेक्स येथील कस्टम्स अधीक्षकाला दहा लाख रुपयांची लाच मागिल्याप्रकरणी अटक केली आहे. कन्साइनमेंट क्लिअरन्स करण्यासाठी कस्टम्स हाऊस एजंट फर्मकडून 10 लाखांची लाच मागितली होती. कन्साइनमेंटची सुलभ क्लिअरिंग सुनिश्चित करण्यासाठी सरकारी कर्मचारी असणारा आरोपी स्वतःसाठी आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने आयात केलेल्या मालाच्या प्रति किलो 10 रुपये दराने लाच मागत असल्याची तक्रार आली होती. यावरुन सीबीआयने सदर आरोपी आणि इतर अज्ञात सरकारी कर्मचारी आणि खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लाच न दिल्याने जाणीवपूर्वक माल रोखण्यात आल्याचा आरोप

तक्रारीनुसार, लाच देण्यास नकार देऊनही, आरोपी मागणी करत राहिला आणि धमक्या देत राहिला. लाच न दिल्याने जाणीवपूर्वक माल रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Dhule News : कर्जाच्या व्याज परताव्यासाठी पाच हजारांची लाच घेतली, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा जिल्हा समन्वयक अटकेत

आणखी वाचा

Comments are closed.